बातम्या

महागाव येथे गोवा बनावटीचा मद्यसाठा पकडला.

Goan made liquor seized in Mahagaon


By nisha patil - 3/24/2025 4:59:43 PM
Share This News:



महागाव येथे गोवा बनावटीचा मद्यसाठा पकडला.

Exice विभागाच्या तोतया कर्मचाऱ्याला अटक.

२७ लाख ७३ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग दोनच्या पथकाने गोवा बनावटीचा अवैध मद्यसाठा पकडला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 27 लाख ७३ हजार 520 रुपये किमतीचा गोवा बनावाटीचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आलाय. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा गणवेश परिधान करणाऱ्या तोतया कर्मचारी नितीन दिलीप ढेरे रा. जाधव वाडी कोल्हापूर व शिवाजी आनंदा धायगुडे राहणार खंडाळा तालुका सातारा या दोघांना अटक करण्यात आलीय.अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आलिय.

राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग क्रमांक दोनच्या पथकास गोवा बनावाटीचा मद्यसाठा इनोवा क्रिस्टा गाडीमधून वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रविवारी २३ मार्च पहाटे सव्वातीन वाजता पोलिसांनी गडहिंग्लज महागाव परिसरामध्ये सापळा रचला. या रोडवरील कामत ओढ्याजवळ रस्त्याच्या कडेला इनोवा कार आणि एक स्विफ्ट डिझायर गाडी आढळून आली. या गाड्यांची झडती घेतली असता गोवा बनावटीचा मद्यसाठा आढळून आला. यामध्ये क्रिस्टा गाडीवर शासकीय दिवा लावण्यात आला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा तोतिया अधिकारी असल्याचे भासवण्यात आले होते. दोघा आरोपींना अटक करण्यात आलीय.त्याच्याकडून सुमारे 27 लाख 73 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरक्षक सत्यवान भगत, सर्वश्री देवेंद्र पाटील,आशिष पवार, पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र मळगावकर, रामचंद्र साटलकर यांच्यासह पथकाने केलीय.


महागाव येथे गोवा बनावटीचा मद्यसाठा पकडला.
Total Views: 30