बातम्या
‘गोकुळ’ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सचिन पाटील, व्हा.चेअरमनपदी पांडुरंग कापसे यांची बिनविरोध निवड
By nisha patil - 1/24/2025 7:43:18 PM
Share This News:
‘गोकुळ’ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सचिन पाटील, व्हा.चेअरमनपदी पांडुरंग कापसे यांची बिनविरोध निवड
कोल्हापूर, ता. २४ : कोल्हापूर जिल्हा सह. दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या., कोल्हापूरच्या चेअरमनपदी गोकुळ दूध संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन महादेव पाटील यांची तर व्हा.चेअरमनपदी पांडुरंग राजाराम कापसे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीची घोषणा यु. एस. उलपे यांच्या अध्यक्षतेखाली राजारामपुरी येथील प्रधान कार्यालयात झाली.
.%5B2%5D.jpg)
नूतन चेअरमन सचिन पाटील यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कारभाराबद्दल चर्चा केली आणि सभासदांच्या हितासाठी विविध आधुनिक सेवा सुविधांचा प्रस्ताव दिला. कर्ज मर्यादेची वाढ १० लाख वरून १२ लाख रुपये करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
‘गोकुळ’ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सचिन पाटील, व्हा.चेअरमनपदी पांडुरंग कापसे यांची बिनविरोध निवड
|