बातम्या
गोकुळच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ
By nisha patil - 11/1/2025 10:40:55 PM
Share This News:
गोकुळच्या म्हैस दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आलीय. तर दुध दर वाढीचा निर्णय म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी गोकुळच्या संचालक मंडळाने घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या सत्कार समारंभात अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी या दरवाढ होणार असल्याचं सांगितले.
म्हैस दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर दुध दर वाढीचा निर्णय म्हैस दुधाचे उत्पादन जास्त व्हावे यासाठी संघाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी गोकुळच्या संचालक मंडळाने आजपासून खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा कोल्हापूरसह जिल्ह्याबाहेरील दूध उत्पादकांना देखील होणार आहे. गोकुळचे सध्या म्हैस दूध संकलन नऊ लाख तीस हजार लिटर प्रतिदिन इतकी आहे. मुंबईसह सर्वच ठिकाणी दुधाला मागणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे ६.५ फॅट व ९.० एसएनएफसाठी शेतकऱ्यांना प्रति लीटर ५४.८० रुपये दर मिळणार आहे. शुक्रवारी झालेल्या सत्कार समारंभात अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी या दरवाढ झाल्याचे सांगितले.
गोकुळच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ
|