बातम्या

सालाबादप्रमाणे गोकुळ शिरगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा.

Gokul shirgav ruturaj patil


By nisha patil - 8/28/2024 12:03:50 PM
Share This News:



कणेरी (प्रतिनिधी) गोकुळ शिरगाव (ता. करवीर )येथील ग्रामदैवत श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा झाला. येथील श्रीकृष्ण मंदिर येथे श्रीकृष्ण मूर्तीची अभिषेक घालून पूजा करण्यात आली. दिवसभर भक्तांची श्रीकृष्ण मंदिरामध्ये दर्शनासाठी रांग लागली होती. श्रीकृष्ण मंदिरामध्ये मूर्तीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती.


दरम्यान आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत डावरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.यावेळी उपसरपंच संतोष गवळी ग्रामपंचायत सदस्य शामराव पाटील (ढेलजे) , रणजीत पाटील, आदीसह सतीश एरंडोले,संदीप  हिंदुराव पाटील, संभाजी मिठारी, विक्रम म्हाकवे, अनिल जाधव, सर्जेराव मिठारी, सागर पाटील (ढेलजे), युवराज चव्हाण, सचिन गुरव, संतोष पाटील, संजय एंरडोले, आदीसह ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सालाबादप्रमाणे गोकुळ शिरगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा.