बातम्या

‘गोकुळश्री’ स्पर्धेत लिंगनूर कसबा नूलच्‍या शुभम मोरे यांची म्‍हैस प्रथम

Gokulshri competition


By nisha patil - 12/28/2024 10:57:49 PM
Share This News:



गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्‍पादन वाढीसाठी व उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी प्रत्‍येक वर्षी गायी व म्‍हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्‍पर्धा घेणेत येते, सन २०२४-२५ मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेमध्‍ये एकूण ९३ म्‍हैस व गाय दूध उत्‍पादकांनी उत्‍साहाने भाग घेतल्‍याने स्‍पर्धेत चुरस निर्माण झाली होती.स्पर्धा २९ नोव्हेंबर रोजी घेण्‍यात आली होती. त्‍यामध्‍ये श्री जोतिर्लिंग सह. दूध व्‍याव. संस्‍था लिंगनूर क ।। नूल ता. गडहिंग्‍लज या संस्थेचे म्‍हैस दूध उत्‍पादक श्री.शुभम कृष्णा मोरे यांच्‍या मुऱ्हा जातीच्या म्‍हैशीने एका दिवसात सकाळ व सांयकाळ पाळीमध्ये एकूण १९ लिटर ७३० मि.ली. इतके दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला तर गायीमध्‍ये श्री जनसेवा सह. दूध व्‍याव. संस्‍था दुधगंगानगर, कसबा सांगाव ता.कागल या संस्थेचे गाय दूध उत्‍पादक श्री.संकेत किरण चौगले यांच्‍या एच.एफ जातीच्या गायीने सकाळ व सांयकाळ पाळीमध्ये एकूण ४२ लिटर ३०५ मि.ली. दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला.

गोकुळशी संलग्‍न असणा-या सर्व प्राथमिक दूध संस्‍थांच्‍या सभासदांकरीता या स्‍पर्धा प्रतिवर्षी घेण्‍यात येतात. ‘गोकुळ श्री’स्‍पर्धेचा प्रमुख उद्देश दूध उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणे, जातिवंत जनावरे खरेदी करणे, जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्‍ये दूध उत्‍पादन वाढवणे याचबरोबर दुग्‍ध व्यवसायामधुन दूध उत्‍पादकांना जास्‍तीत-जास्‍त लाभ करून देणे तसेच तरूण पिढीला या व्‍यवसायकडे आकर्षित करून दूध व्‍यवसाय वाढविणे हा आहे. गोकुळने ही स्‍पर्धा गेल्‍या ३१ वर्षापासून आपल्‍या कार्यक्षेत्रामध्‍ये सुरू केलेली आहे.


‘गोकुळश्री’ स्पर्धेत लिंगनूर कसबा नूलच्‍या शुभम मोरे यांची म्‍हैस प्रथम
Total Views: 28