बातम्या
सर्पमित्रांच्या कार्याला ग्रामपंचायतीचा पाठिंबा..
By nisha patil - 1/27/2025 1:50:43 PM
Share This News:
सर्पमित्रांच्या कार्याला ग्रामपंचायतीचा पाठिंबा..
माणगाव ग्रामपंचायतीकडून 11 हजारांचा धनादेश व 10 लाखांचा विमा जाहीर
साप पकडणाऱ्या सर्पमित्रांसाठी माणगाव ग्रामपंचायतीचा महत्वपूर्ण निर्णय
माणगाव गावातील नागरी वस्तीमध्ये आढळणारे साप स्वतःचा जीव धोक्यात घालून पकडून सुरक्षित स्थळी सोडणाऱ्या सर्पमित्र ऋतुराज मायगोंडा, सिद्दीक म्हालदार, आणि संदेश व्हनवाडे यांच्या कार्याला ग्रामपंचायतीने मान्यता देत आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.
ग्रामपंचायत माणगावच्या वतीने सर्पमित्रांसाठी 11 हजार रुपयेचा धनादेश सर्प पकडण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी प्रदान करण्यात आला. हा धनादेश ज्येष्ठ नेते व माजी सरपंच अनिल पाटील दादा आणि विकासरत्न सरपंच राजु मगदूम दादा यांच्या हस्ते देण्यात आला.
याचबरोबर सर्पमित्रांसाठी 10 लाख रुपयांचा विमा ग्रामपंचायतीकडून उतरविण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले.या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य अभिजीत घोरपडे, राजगोंडा पाटील, प्रकाश पाटील, तसेच दत्तात्रय बन्ने, अमोल मगदूम, रोहन पाटील, स्वप्निल हानबर, भाऊसो हेरवाडे, बबन परीट, चंद्रकांत बाळीकाई, सतीश महाजन, निसार मुल्ला आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्पमित्रांच्या कार्यामुळे गावातील नागरीकांचे प्राण वाचण्यास मदत होत असून, त्यांच्या या धाडसी व निःस्वार्थ सेवेबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
सर्पमित्रांच्या कार्याला ग्रामपंचायतीचा पाठिंबा..
|