बातम्या

बांबवडेत भव्य शिवरात्री उत्सव...

Grand Shivratri festival in Bambavade


By nisha patil - 2/24/2025 3:10:17 PM
Share This News:



बांबवडेत भव्य शिवरात्री उत्सव...

१०० फूट गुफा व १२ ज्योतिर्लिंग दर्शनाचा दिव्य देखावा

आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन

बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे महाशिवरात्रीनिमित्त १०० फुटी गुफा, १२ ज्योतिर्लिंग दर्शन, ११ फुटी धबधबा आणि भव्य शंकर मूर्तीचा पवित्र देखावा साकारण्यात आला. या भव्य देखाव्याचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते संपन्न झाले.

बांबवडे येथे महाशिवरात्री निमित्त भव्य देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ. विनय कोरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


बांबवडेत भव्य शिवरात्री उत्सव...
Total Views: 52