बातम्या
"भव्य मंजुरी पत्रांचा वाटप कार्यक्रम...!"डॉ. राहुल आवाडे
By nisha patil - 10/15/2024 7:30:00 PM
Share This News:
संजय गांधी निराधार योजनेतील मंजुरी पत्रकांचे वितरण श्रीमंत घोरपडे नाट्यगृह येथे खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने वहिनी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण योजना पोहोचवल्या आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून निराधार व्यक्तींना, विधवा आणि घटस्फोटीत महिलांना तसेच वयोवृद्ध व्यक्तींना दरमहा अनुदान दिले जाते.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकार, ज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करत आहेत, हे जनकल्याणासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी करत आहेत.
यावेळी प्रमुख पदाधिकारी, संजय गांधी निराधार समितीचे सर्व सदस्य व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"भव्य मंजुरी पत्रांचा वाटप कार्यक्रम...!"डॉ. राहुल आवाडे
|