बातम्या
"एलिक्झा पार्क" प्रकल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा
By nisha patil - 2/15/2025 2:55:57 PM
Share This News:
कोल्हापूर शहरात बांधकाम व्यवसायामध्ये नवा आयाम निर्माण करणा-या ‘एलिक्झा पार्क’ या अजयसिंह व्ही. देसाई यांच्या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा खासदार शाहू छत्रपती महाराज आणि विठ्ठलराव देसाई यांच्या हस्ते तसेच डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील साहेब आणि आ.सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी बोलताना आ. सतेज पाटील म्हणाले, सर्वसामान्य पार्श्वभूमी असतानाही कष्ट, सचोटी आणि जिद्दीच्या जोरावर यशाची नवी क्षितिजे गाठणारे अजयसिंह व्ही. देसाई यांनी कोल्हापूरच्या बांधकाम क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ग्राहकांच्या गरजा ओळखून आधुनिकतेशी मेळ घालत शहरामध्ये त्यांनी दिमाखात उभारलेली एलिक्झा पार्कची वास्तू शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे.
या सोहळ्याला माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत, आमदार जयंतराव आसगावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज संजय पाटील, संजयबाबा घाटगे, बेळगावचे माजी आमदार संजय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर, यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सहउपस्थिती लाभली.
"एलिक्झा पार्क" प्रकल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा
|