बातम्या

राज्यपालांकडून बाप्पाला निरोप

Greetings from the Governor to Bappa


By nisha patil - 9/13/2024 12:20:47 AM
Share This News:



राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे बुधवारी (दि. 11) गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राजभवन येथे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.

राज्यपालांनी कुटुंबातील सदस्य तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह गणरायाची आरती केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला. गणेशमूर्ती विसर्जन करताना पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता ते कृत्रिम हौदात करावे, अशी सूचना राज्यपालांनी केल्यामुळे मूर्तीचे विसर्जन हौदात करण्यात आले.

नाशिक मध्यवर्ती कैद्यांनी तयारी केली शाडूची मुर्ती

राज्यपालांच्या निवासस्थानी मांडलेली गणेशाची मूर्ती शाडूची होती. ही मूर्ती नाशिक येथील कारागृहातील कैद्यांनी तयार केली होती. विसर्जनाच्या वेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहसचिव श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


राज्यपालांकडून बाप्पाला निरोप