बातम्या

छत्रपती शिवरायांना अभिवादन

Greetings to Chhatrapati Shivaraya


By nisha patil - 2/19/2025 9:50:42 PM
Share This News:



छत्रपती शिवरायांना अभिवादन

कोल्हापूर, दि. 19 फेब्रुवारी – क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद) साळवे प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त निवृत्ती चौक, शिवाजी पेठ येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रतिष्ठानचे सल्लागार आणि सिटी क्रिमिनल बारचे अध्यक्ष अॅड. दत्ताजीराव कवाळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी अॅड. कवाळे यांनी "छत्रपती शिवरायांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. राष्ट्रउन्नतीसाठी तंत्रज्ञानासोबत कौशल्य व मनुष्यबळाचा योग्य वापर करणे हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांचे युद्धनीती, आरमार आणि दुर्गबांधणी यांचे आधुनिक संदर्भातही महत्त्व कायम आहे," असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाला रिपाईच्या रूपाताई वायदंडे, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ भोसले, महसूल विभागाचे संचालक गजानन कुरणे, बॉन्सर असोसिएशनचे अध्यक्ष विनायक पाटील, युवा उद्योजक ओंकार पाटील, चेतन डावाळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, प्रदेशाध्यक्ष राहुल गणेश्चार्य आदी मान्यवर उपस्थित होते.


छत्रपती शिवरायांना अभिवादन
Total Views: 48