बातम्या

शाहू कारखाना कार्यस्थळावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

Greetings to Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj at the Shahu factory work site


By nisha patil - 6/26/2024 11:20:27 PM
Share This News:



कागल : बहूजन समाज उद्धारक, लोकराजा छत्रपती राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची १५० वी जयंती  शाहू साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर  मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी  शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे  समरजितसिंह घाटगे  यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या  पुतळ्याचे पूजन  संपन्न झाले. 

  प्रधान कार्यालयातील कागल संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या  प्रतिमेचे व   कारखान्याचे संस्थापक स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या पुतळ्यासही श्री घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी कारखान्याचे संचालक 
शिवाजीराव पाटील, सतीश पाटील माजी संचालक एम आय चौगुले यांनी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. 

    यावेळी कारखान्याचे  व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे,  सर्व  संचालक  कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, आदींसह शाहू ग्रूपमधील विविध संस्थाचे पदाधिकारी,सभासद शेतकरी अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी फटाक्यांची आतषबाजी व शाहू महाराज की जय अशा घोषणांनी परीसर दुमदुमुन गेला .


शाहू कारखाना कार्यस्थळावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन