विशेष बातम्या

रायगड अलिबाग येथे 300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचा भूमीपुजन समारंभ

Groundbreaking Ceremony


By nisha patil - 6/3/2025 2:16:41 PM
Share This News:



रायगड अलिबाग येथे 300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचा भूमीपुजन समारंभ

नागरिकांना अत्याधुनिक सेवा पुरविण्यात येणार : ना.प्रकाश आबिटकर

रायगड अलिबाग येथील 300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचा भूमीपुजन समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. रायगड जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत उपचार व उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही ना. प्रकाश आबिटकरांनी दिली.

ना. प्रकाश आबिटकर बोलताना म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील आरोग्य विषयक सेवा बळकट करण्यावर प्राधान्याने लक्ष देण्यात येईल. या माध्यमातून नागरिकांना अत्याधुनिक सेवा पुरविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाने आरोग्य सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतलेला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी राज्यात सुरु आहे. जिल्हा रुग्णालयाची इमारत उत्कृष्ट आणि दर्जेदार होण्यासाठी यंत्रणानी दक्ष रहावे. या इमारतीच्या बांधकामात कुठल्याही प्रकारची तडजोड स्विकारली जाणार नाही अशा सूचनाही यावेळी दिल्या.

यावेळी उद्योगमंत्री ना .उदय सामंत, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री ना.भरत गोगावले, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत आमदार महेंद्र थोरवे, यांसह विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


रायगड अलिबाग येथे 300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचा भूमीपुजन समारंभ
Total Views: 27