पदार्थ

कोकणचा हापूस कोल्हापुरात दाखल

Hapus of Konkan entered Kolhapur


By nisha patil - 12/2/2025 11:01:44 PM
Share This News:



कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड मध्ये आज हापूस आंब्याचा पहिला लिलाव पार पडला.या  लिलावात एका आंब्याला 1 हजार 8 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला.

सव्वा डझनाच्या एका पेटीला प्रसाद वळुंज यांनी 15 हजार 121 रुपयांची बोली लावली.एका हापूस आंब्याची किंमत 1008 रुपये झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण इथल्या रामचंद्र ठाकूर यांच्या बागेतील आंब्याला हा विक्रमी दर मिळाला.

शाहू मार्केट यार्ड मध्ये सकाळी बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई यांच्या हस्ते आंब्याचे लिलाव काढण्यात आला. 2100 पासून बोलीची सुरुवात झाली.बोली वाढत जाऊन तब्बल 15121 रुपयाला प्रसाद वळुंजे यानी सर्वाधिक बोली लावून पेटी खरेदी केली.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील, संचालक दिलीप पवार,सचिव जयवंत पाटील, उपसचिव गजानन पाटील , सचिव तानाजी दळवी, यांच्यासह बाजार समितीचे संचालक अधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते.


कोकणचा हापूस कोल्हापुरात दाखल
Total Views: 69