बातम्या
मिरजकर तिकटी चौकातील वटवृक्ष पाडण्याची महापालिकेने सुपारी घेतली आहे काय ?
By nisha patil - 6/27/2024 8:09:30 PM
Share This News:
मंगळवार पेठेतील मिरजकर् तिकटी चौकात ७० ते ८० वर्षापासून एक डेरेदार वटवृक्ष मानवी जीवाला ऑक्सिजन देण्याचे काम करीत डोलदारपणे उभा आहे त्याची उंची आहे यापूर्वी चार-पाच वर्षांपूर्वी प्रतिवर्षी उद्यान निरीक्षक या झाडाची पाहणी करून झाड सुरक्षित रित्या राहील या दृष्टीने झाडाचा बॅलन्स करून फांद्यांची छाटणी करीत होते पण अलीकडच्या काळात का कोणास ठाऊक कदाचित काही लोकांना हा वृक्ष तिथे नको असावा म्हणून की काय लोकांनी तक्रार करून सुद्धा महापालिकेची मंजुरी असताना सुद्धा ठेकेदार जाणीवपूर्वक या झाडाची फांद्या छाटून भार कमी करून छाटणी करीत नाहीत.कारण यापूर्वी हे झाड पाडण्याचा बराच वेळा प्रयत्न झाला होताआणि आता झाडाच्या फांद्या अवास्तववेड्यावाकड्या वाढल्यामुळे वाऱ्याच्या झोतामुळे झाड उन्मळून पडावे अशा अपेक्षेने प्रयत्न सुरू असावेत असा येथील नागरिकांचा कयास आहे संपूर्ण चौकाला शोभाआणून नागरिकांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या या झाडाची येथे आवश्यकता आहे म्हणून महापालिकेने ताबडतोब झाडाची छाटणी करून झाडाला आधार द्यावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे
मिरजकर तिकटी चौकातील वटवृक्ष पाडण्याची महापालिकेने सुपारी घेतली आहे काय ?
|