बातम्या
हसन मुश्रीफ यांनी सोडले पालकमंत्रीपद..
By nisha patil - 5/3/2025 3:29:55 PM
Share This News:
हसन मुश्रीफ यांनी सोडले पालकमंत्रीपद..
हे कारण आले समोर...
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. कोल्हापूर, मुंबई आणि वाशिम असा जवळपास 800 किमीचा सततचा प्रवास आणि कामकाजातील अडथळे लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, वाशिमच्या पालकमंत्रीपदासाठी आता क्रीडा मंत्री दत्ताभरणे यांचे नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा आहे. लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
याचवेळी, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदांवरून महायुतीत पक्षांमध्ये अजूनही तणाव कायम आहे. हसन मुश्रीफ यांच्या या निर्णयामुळे वाशिमच्या विकासकामांवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र नवे पालकमंत्री कोण, यावर सर्वांचे लक्ष आहे.
हसन मुश्रीफ यांनी सोडले पालकमंत्रीपद..
|