बातम्या
ओले खोबरे खाण्याचे आरोग्यदायी फायदे
By nisha patil - 11/9/2024 1:08:55 AM
Share This News:
ओल्या खोबऱ्यात व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शियम, मिनरल्स भरपूर प्रमाणात असते. गृहिणी स्वयंपाकात
खोबऱ्याचा वापर करतात नारळाचे उत्पादन मुख्यतः कोकणामध्ये होते नारळाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. नारळाचं पाणी शरीरासाठी अतिशय पोषक असते
ओल्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात जे आपल्या चेहऱ्यासाठी खूपआवश्यक असतात. ज्यांची त्वचा निस्तेज आणि कोरडी आहे त्यांनी नारळाच्या दुधाने चेहऱ्याला मसाज केल्यास चेहरा एकदम टवटवीत दिसतो. वजन कमी करण्यासाठी नारळ अतिशय उपयुक्त ठरतो. नारळाचे दूध हे भुकेवर नियंत्रण ठेवते त्यामुळे वजन नियंत्रित राहते. खोबरे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. ओले खोबरे सोबत गुळ देखील खाऊ शकतो अथवा बदामाची पूड खाल्ल्यानेही बराच फायदा होतो. खोबरे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.
ओल्या खोबऱ्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. जर तुमचे पोट साफ होत नसेल तर तुम्ही नित्य खोबरे खा त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल. केस गळत असतील तर त्याचे पाणी केसांना लावू शकता त्यामुळे तुमचे केस गळणे बंद होईल. केसांसाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे या पाण्यामुळे तुमचे केस मुलायम देखील होतील.
ओले खोबरे खाण्याचे आरोग्यदायी फायदे
|