बातम्या
आरोग्यदायी कांदा
By nisha patil - 9/18/2024 8:41:28 AM
Share This News:
कांद्याचे काही महत्वपूर्ण फायदे –
दुखणे, सुजणे व मासपेशी ताठरने ह्या व्याधी दूर करणे.
कांदा पोटातील कृमी नष्ट करण्यास एक नैसर्गिक प्रतिजैविक मानले जाते.
जठरातील फोड होऊ देत नाही, सोबतच अपचनाची समस्या, पोटातील वायू वाढणे ह्या समस्या दूर करतो.
मूत्रवर्धक पाचक, संक्रमणाशी, टॉनिक आणि उत्तम उत्तेजक रुपात कांदा खाल्ला जातो.
कोलेस्ट्रोल आणि उच्च रक्तदाब आणि इतर हृदयविकारात शरीरास बळ देतो.
शरीरात गाठी होणे व कर्करोगास मदत करणाऱ्या तत्वांचा नाश करतो.
रक्तास घट्ट करतो, रक्त शुद्ध करण्यास सहाय्यक ठरतो.
कफ, सर्दी, तापिपासून वाचवतो.
शरीरातील रक्तातील साखरेची मात्रा नियंत्रित करतो. दातांच्या सडण्यापासून वाचवतो.
कांद्यापासून होणारे काही स्वास्थ लाभ –
१. बाळंत बाईने कांदा खाल्ल्यास स्तनात दुधाची वृद्धी होते.
२. खाण्यासोबत कच्चा कांदा खाणे आरोग्यदायी मानले जाते.
३. रोज कांदा सेवन केल्यास डोळ्यांच्या समस्या दूर होतात.
४. लाल कांदा सेवनामुळे निद्रानाश हि समस्या पूर्णपणे दूर केली जाते.
५. कुत्रा चावणे
कांदा बारीक करून पिसून त्याच्यात शहद समप्रमाणात मिळवून त्यास कुत्रा चावलेल्या जखमेवर लावतात त्यामुळे जखम लवकर बरी होते. जैविक संक्रमण रोखले जाते.
६. कानामधील वेदना
कांद्याच्या रसात खोबरेल तेल मिळवून २-3 थेंब कानात टाकल्यास कानातील वेदना दूर होतात.
७ उष्माघात
कांद्याच्या रसाचा वापर उष्माघातावर होतो. रसास कपाळावर,पायाच्या व हाताच्या तळावर लावून कांदा रस ५० ml व शहद २ चम्मच मिळवून घेतल्यास उष्माघाताचा त्रास कमी होतो.
८. केस काळे
केस काळे राहण्यासाठी कांदा रस आंघोळीच्या पाण्यात मिळवून त्याने डोके धुतल्यास केस काळे होण्यास मदत मिळते.
९ अपचन समस्या
रोज कांदा जेवणासोबत कच्चा खावा. यामुळे अन्नपचन होते व जठराच्या कामात गती येते.पोटातील वायू व अपचन यामुळे दूर होतो. एक कांदा आगेत भाजून त्याचा गर पिसून त्यात थोड मीठ घालून पिल्यास पोटातील वायू कमी होतो.
१०. अजीर्ण
लाल कांदा कापा. त्यावर निंबू रस चोळा व खाण्यात वापरा यामुळे अजीर्ण समस्या दूर होईल. लहान मुलांना कांदा रसाच्या ५-६ थेंबात शहद मिळवून दिल्यास त्यांच्या पोटाच्या कृमिचा नाश होतो.
११ एसिडीटी
६० ग्राम पांढरा कांदा कापून त्यात दही मिळवावे ताजे ताजे खावे. ४-५ वेळा खाल्ल्यास एसिडीटी चा त्रास होणार नाही.
१२. अतिसार व उलट्या
लहान मुलांमध्ये हगवणीच्या वेळी त्रास कमी करण्यासाठी नाभीवर लावल्यास २-3 वेळा परत लावल्यास हा त्रास कमी होतो.
१३. मूत्रपिंडातील मूतखडे
कांदा रसात गाडी साखर बारीक करून एकत्र करून उन्हात ठेवावे नंतर रोज सकाळी २ चम्मच हे मिश्रण कोमट पाण्यासोबत खावे. मूतखड्यापासून आराम मिळेल.
१४ अस्तमा
कांदा रस एका डबीत कापूस भरून त्यात ओतावा नंतर वेळोवेळी त्याचा गंध नाकाद्वारे घेत राहिल्यास अस्तमाचा त्रास कमी होतो. कांदा रसात शहद मिळवून रोज २ चम्मच घेतल्यास अस्तमा बारा होतो. कांदा रसासोबत शहद घेतल्यामुळे सर्दी व कफ कमी होतो.
१५. डोकेदुखी
उष्माघातामुळे जर डोकेदुखी होत असेल तर कांदा रस काढून डोक्यावर त्याचा लेप लावावा. तळहात पायावर लावल्यास लवकर आराम मिळतो.
१६. दातांची सुरक्षा
रोज कांदा खाल्ल्यास दातांचे दुखणे कमी होते. दात ठणकत असेल तर कांदा पेस्ट ठणकेवर ठेवावे त्यामुळे आराम मिळेल.
१७. हृदयासंबंधी विकार
खाण्यात रोज कांदा वापरला तर हृदयासंबंधी बरेच विकार दूर होतील. शरीरात रक्ताचा पुरवठा योग्य गतीत करण्यास कांदा मदत करतो.
१८. त्वचा रोगांवर लाभकारी
कांद्याची पेस्ट त्वचारोगावर लावल्यास तो रोग बारा होण्यास मदत मिळते. कांदा रस उकडून त्यास त्वचेवर लावल्यास त्वचेवरील संक्रमण दूर होतात.
१९ नाक फुटणे
कांदा फोडून प्रभावित नासिका समोर ठेवून जोरात श्वास घेतल्यास नाक फुटणे हि समस्या दूर होते.
२०. अनेमिया
कांदा रस सरळ किंवा कांदा कच्चा खाल्ल्यास शरीरात लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत मिळते.तसेच रक्ताचे प्रमाण वाढवितो.
२१. उलटी
समान मात्रेस कांदा रस व अद्रकास मिळवून शहदा सोबत घेतल्यास उलटीची समस्या दूर होते. रक्तातील शुद्धता वाढवण्यासाठी १० ग्राम साखर व १ चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पूड ५० ग्राम कांदा रसात मिळवून घेतल्यास फायदा होतो.
आरोग्यदायी कांदा
|