बातम्या
कोल्हापुरात हेल्मेट सक्ती ? त्या मेसेज चे काय आहे सत्य !
By nisha patil - 11/28/2024 7:48:44 PM
Share This News:
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या अपघातामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमद्ये हेल्मेट सक्ती करण्याचा आदेश अप्पर पोलीस महासंचालयाकडून काढण्यात आलाय.अशा आशयाचे पत्रक सोशल मीडियावर वायरल झाले आहे .यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यंसह कोल्हापूरचा हि समावेश आहे.या पत्रानुसार कोल्हापुरात येत्या २ डिसेम्बर पासून हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचा मेसेज वायरल झालाय.
त्यामुळे दुचाकी चालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालाय.मात्र याबाबत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्याशी संपर्क साधला आता त्यांनी सांगितले कि, " याबाबत कोणतेही अधिकृत आदेश अद्यापही आलेला नाहीत.जेव्हा आदेश प्राप्त होतील तेव्हा अभ्यास करून निर्णय घेतला जाईन " त्यामुळे २ डिसेम्बर पासून कोल्हापुरात हेल्मेट सक्ती लागु केली जाणार अशा आशयाच्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेज मध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचं स्पष्ट झालय .
कोल्हापूरकरांचा हेल्मेट नेहमीच सक्तीला विरोध राहिला आहे . अगोदर रस्ते नीट करा, ट्रॅफिकची समस्या सोडवा, मगच हेल्मेटची विचारणा करा. असा सूर नागरिकांमधून उमटत आहे .
कोल्हापुरात हेल्मेट सक्ती ? त्या मेसेज चे काय आहे सत्य !
|