बातम्या
श्री तुळजाभवानी मंदिरातील सोने-चांदी वितळवण्याची धाराशीव जिल्हाधिकारींची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
By nisha patil - 1/24/2025 7:48:32 PM
Share This News:
श्री तुळजाभवानी मंदिरातील सोने-चांदी वितळवण्याची धाराशीव जिल्हाधिकारींची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
संभाजीनगर, दि. २४ : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तिजोरीतील सोने-चांदी वितळवण्याच्या धाराशीव जिल्हाधिकार्यांच्या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले.
हिंदु जनजागृती समितीच्या कडाडून विरोधामुळे भक्तांच्या श्रद्धेचे रक्षण झाले असून, देवस्थानातील अपहार उघडकीस आणण्यासाठी समितीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने २००९ ते २०२४ या कालावधीत सोने वितळवण्यास अनुमती देण्याची मागणी फेटाळली. समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
श्री तुळजाभवानी मंदिरातील सोने-चांदी वितळवण्याची धाराशीव जिल्हाधिकारींची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
|