बातम्या
विवेकानंदमध्ये हिंदी दिवस संपन्न
By nisha patil - 9/25/2024 8:04:14 PM
Share This News:
साहित्यातूनच व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा विकास होत असतो. भाषेमुळेच व्यक्तीचे व्यक्तीमत्वाचा ठसा उमटतो. म्हणून भाषेचा वापर विचार करुन करावा. भाषा माणसाचे मस्तक जागृत ठेवण्याचे काम करते. हिंदी भाषेचे साहित्य अशाच प्रकारचे आहे. हिंदी भाषा ही माणसाला माणूस बनविण्याचे काम करते. असे मत शंकरराव जगताप आर्टस् एंड कॉमर्स कॉलेज, वाघोली की हिंदी विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. शाहीन पटेल यांनी व्यक्त केले. त्या विवेकानंद कॉलेजच्या हिंदी विभागाच्यावतीने आयोजित हिंदी सप्ताह समारोप समारंभाप्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर हे होते.
डॉ. शाहीन पटेल पुढे म्हणाल्या की, भाषा ही एक असे माध्यम आहे की ज्यामुळे मनुष्य आपले विचार, आपली भावना दूसयांसमोर व्यक्त करु शकतो. भाषेचा वापर करताना काळजीपूर्वक करावा. विद्यार्थ्यांनी भाषेचा बारकाइने अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे नेहमी भाषेचा प्रयोग करताना विचार करुनच केला पाहिजे. व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ही त्याच्या भाषेतूनच होत असते. भाषेच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत.
अध्यक्षीय भषणात डॉ. एकनाथ आळवेकर म्हणाले की, व्यक्तीची ओळख ही त्याच्या व्यक्तिमत्वासोबत भाषेमुळेच होत असते. भाषेमुळेच व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटत असतो. मग ती कोणतीही भाषा असो. हिंदी भाषेमध्ये माधुर्य आणि गोडवा आहे. ज्ञान आत्मसात करण्यासाठी आपणास अनेक भाषा येणे गरजेचे आहे. भाषेतील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी आहेत. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.
हिंदी सप्ताहामध्ये निबंध स्पर्धा, स्वरचित काव्य वाचन स्पर्धा, समीक्षा लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत सिद्धी नानासो लोहार-प्रथम, नाजिया राकेश नदाफ-द्वितीय, निलमनारायनलाल पुरोहित- तृतीय, महेक इमरान मुलाणी हीला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत नाजिया राकेश नदाफ-प्रथम, पायल संजय पारजी-व्दितीय, सिद्धी नानासो लोहार-तृतीय, क्रमांक मिळाला. वक्तृत्व स्पर्धेत शुभांगी राजकुमार दुबे-प्रथम, महेक इमरान मुलाणी-व्दितीय, नाजिया राकेश नदाफ-तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. समीक्षा लेखन स्पर्धेत नाजिया राकेश नदाफ-प्रथम, शफाकहुसैन मोमीन -व्दितीय, पायल संजय पारजी - तृतीय क्रमांक मिळाला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ. आरिफ महात यांनी केले. पाहुण्यांची ओळख हिंदी विभाग विभागाचे के सहाय्यक प्राध्यापक डॉ. दीपक तुपे यांनी करुन दिली. कार्यक्रमाचे आभार कनिष्ठ हिंदी विभागप्रमुख प्रा. विश्वंभर कुलकर्णी यांनी मानले. सूत्रसंचालन कनिष्ठ हिंदी विभागाच्या प्राध्यापिका सौ. एस. पी. वेदांते यांनी केले. कार्यक्रमात हिंदी विभागाचे विद्यार्थी - विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेकानंदमध्ये हिंदी दिवस संपन्न
|