बातम्या

महाकुंभमेळ्याबाबतच्या वक्तव्यावर हिंदु जनजागृती समितीचा निषेध

Hindu Janajagruti Samiti


By nisha patil - 2/17/2025 9:50:54 AM
Share This News:



महाकुंभमेळ्याबाबतच्या वक्तव्यावर हिंदु जनजागृती समितीचा निषेध

नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी महाकुंभमेळ्याला ‘फालतू’ म्हणत दिलेल्या वक्तव्यावर हिंदु जनजागृती समितीने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी या वक्तव्याबद्दल यादव यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

महाकुंभमेळा हा भारतातील सर्वांत मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, करोडो हिंदू भाविक आणि परदेशी पर्यटक त्यात सहभागी होतात. यादव यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत, “कुंभला काही अर्थ नाही. कुंभ फालतू आहे,” असे विधान केल्याचे वृत्त आहे.

हिंदु जनजागृती समितीने हे वक्तव्य हिंदू धर्माचा अपमान असल्याचे सांगितले असून, “यादव यांनी अन्य धर्मीयांच्या तीर्थयात्रांबाबत असे वक्तव्य कधीच केले नाही. सरकारने तातडीने त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी,” अशी मागणी केली आहे.


महाकुंभमेळ्याबाबतच्या वक्तव्यावर हिंदु जनजागृती समितीचा निषेध
Total Views: 38