राजकीय

चंदगडमध्ये शिवाजी पाटील यांचा ऐतिहासिक विजय!

Historic victory of Shivaji Patil in Chandgarh


By nisha patil - 11/23/2024 1:22:19 PM
Share This News:



चंदगडमध्ये शिवाजी पाटील यांचा ऐतिहासिक विजय! 

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना धक्का देत विजयी पताका फडकवली

चंदगड विधानसभा मतदारसंघात अपक्ष आणि भाजप पुरस्कृत उमेदवार शिवाजी पाटील यांनी प्रचंड चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या उमेदवारांना पराभूत करत दणदणीत विजय मिळवला आहे. शरद पवार गटाच्या नंदाताई बाभुळकर आणि अजित पवार गटाचे राजेश पाटील या दोन्ही दिग्गजांना जोरदार टक्कर देत पाटील यांनी आपल्या विजयाचे परचम चंदगडमध्ये फडकावले आहे.

शिवाजी पाटील यांनी संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांशी थेट संवाद साधत आपली ताकद दाखवली आणि शेवटच्या क्षणापर्यंत मतदारसंघात विश्वासार्हता टिकवून ठेवली.


चंदगडमध्ये शिवाजी पाटील यांचा ऐतिहासिक विजय!