ताज्या बातम्या
पन्हाळगडावर ऐतिहासिक सोहळा..
By nisha patil - 2/19/2025 1:04:53 PM
Share This News:
पन्हाळगडावर ऐतिहासिक सोहळा..
3000 हून अधिक नागरिक विद्यार्थ्यांचा सहभाग..
पन्हाळगडावर ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५व्या जयंतीनिमित्त पन्हाळगडावर ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत ३,००० हून अधिक विद्यार्थी, नागरिक आणि शासकीय अधिकारी सहभागी झाले.
यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सारथी संस्थेचे सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या पदयात्रेद्वारे शिवचरित्राचा जागर करण्यात आला असून, गडकोट संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
पन्हाळगडावर ऐतिहासिक सोहळा..
|