आरोग्य

पित्त दोष संतुलित करण्याचे घरगुती उपाय.

Home remedies to balance pitta dosha


By Administrator - 1/15/2025 4:50:24 PM
Share This News:



पित्त दोष संतुलित करण्याचे घरगुती उपाय.
1) पित्त दोष संतुलित ठेवण्यासाठी आहारात तूप, लोणी आणि दुधाचा समावेश करा. 

२) पित्त असंतुलित असेल किंवा वाढलं असेल तर, आंबट फळं खाणं टाळा. ते संतुलित करण्यासाठी गोड फळांचे सेवन करा.

३) पित्त दोष शांत करण्यासाठी कोरफड, व्हीटग्रासचा रस पिऊ शकता. किंवा दुधीचा रस देखील उपयुक्त आहे.

४) पित्ताचे प्रमाण आवळ्याच्या रसानेही संतुलित करता येते. असे अनेक पोषक घटक त्यात आढळतात, जे पित्ताचे संतुलन राखण्यास मदत करतात.

५) पित्तदोषामुळे शरीरातील अग्नीचे प्रमाण वाढते, अशा स्थितीत भरपूर पाणी प्यायल्याने ते शांत होऊ शकते.

६) पित्त दोष संतुलित करण्यासाठी आपण गुलकंद पिऊ शकता. याचा कूलिंग इफेक्ट आहे, ज्यामुळे शरीरातील आग शांत होते.

७) शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढले की, आपण बडीशेप, व धणे मिक्स करून पाणी पिऊ शकता. यासाठी रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप आणि धणे मिसळून भिजत ठेवा, व सकाळी त्याचे पाणी प्या.

8) पित्त दोष संतुलित करण्यासाठी पुदिन्याचे पाणी देखील उपयुक्त आहे.

9) मनुका पित्त दोष शांत करण्यास मदत करते. दुधात मनुके टाकून खा. याने शरीराला फायदा होतो.

10) भाज्यांमध्ये काकडी, शिमला मिरची, कडधान्य, पालेभाज्या, सोयाबीन आणि दुधीचा समावेश करा.

पित्त दोष संतुलित ठेवण्यासाठी आहारात 

1)तूप, लोणी आणि दुधाचा समावेश करा. २) पित्त असंतुलित असेल किंवा वाढलं असेल तर, आंबट फळं खाणं टाळा. ते संतुलित करण्यासाठी गोड फळांचे सेवन करा. ३) पित्त दोष शांत करण्यासाठी कोरफड, व्हीटग्रासचा रस पिऊ शकता..


पित्त दोष संतुलित करण्याचे घरगुती उपाय.
Total Views: 139