बातम्या
रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा: हरवलेली लॅपटॉप बॅग सुरक्षित परत केली
By nisha patil - 11/2/2025 8:13:37 PM
Share This News:
रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा: हरवलेली लॅपटॉप बॅग सुरक्षित परत केली
कोल्हापूर, दि. ११ फेब्रुवारी २०२५ - शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील एका प्रामाणिक रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवत प्रवाशाची हरवलेली लॅपटॉप बॅग सुरक्षित परत केली.
इशिता अनुज गुप्ता (रा. सीपीआर हॉस्पिटल) या दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सीपीआर हॉस्पिटल येथून कावळा नाक्याच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांच्या रिक्षात लॅपटॉप असलेली बॅग विसरली. मात्र, रिक्षा चालक बाळकृष्ण राहू गजगेश्वर (रा. शिंगणापूर) यांनी ती बॅग शाहूपुरी पोलीस ठाण्यात जमा केली.
आज, इशिता गुप्ता यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाला बोलावून घेतले आणि त्यांच्या हस्ते इशिता गुप्ता यांना बॅग परत करण्यात आली.
या घटनेची दखल घेत, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी रिक्षाचालक बाळकृष्ण गजगेश्वर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या प्रामाणिकतेमुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे.
रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा: हरवलेली लॅपटॉप बॅग सुरक्षित परत केली
|