बातम्या

तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा मानाचा तुरा...

Honorable mention of Tej Computer Institute


By nisha patil - 12/18/2024 10:46:38 PM
Share This News:



तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा मानाचा तुरा... 

 MKCL Best Center Award 2024 ने सन्मानित

Vo: दि. 18 डिसेंबर 2024 रोजी कराड येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र विभागीय वार्षिक सभेत तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटला MKCL Best Center Award 2024 for Maximum Placement हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान MKCLच्या व्यवस्थापकीय संचालिका मा. वीणा कामथ मॅडम, वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री. अतुल पतौडी, Sunbeam कराडचे सीईओ श्री. सारंग पाटील, RLC प्रमुख श्री. गावंडे, आणि LLC समन्वयक श्री. सचिन भोईटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना MS-CIT, Tally, CSMS-DEEP आणि इतर आधुनिक संगणक कोर्सेसच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. संस्थेतील प्रत्येक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची अथक मेहनत, तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांची तळमळ या यशामागे ठळकपणे दिसून येते.

पुरस्कार स्वीकारताना संस्थापकांनी हा सन्मान संस्थेतील प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, व त्यांच्या यशस्वी कामगिरीसाठी समर्पित केला. तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा हा मानाचा तुरा विद्यार्थ्यांच्या यशाची प्रेरणा ठरेल, असा विश्वास संस्थापकांनी व्यक्त केला.


तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा मानाचा तुरा...