बातम्या

सैनिकांच्या पाल्यांसाठी वसतिगृह प्रवेश सुरू

Hostel admissions open for children of soldiers


By nisha patil - 2/4/2025 12:00:32 AM
Share This News:



सैनिकांच्या पाल्यांसाठी वसतिगृह प्रवेश सुरू

कोल्हापूर – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज 1 एप्रिलपासून उपलब्ध असून, प्रवेश दोन टप्प्यात होणार आहे.

पहिल्या टप्प्यात (11वी, 12वी व अन्य वर्ग) अर्ज अंतिम दिनांक 15 जून 2025, तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी दुसऱ्या टप्प्यात अर्ज अंतिम दिनांक 15 ऑगस्ट 2025 आहे.

वसतिगृह प्रवेशासंबंधी अधिक माहिती व अर्ज संबंधित वसतिगृहात उपलब्ध आहेत.


सैनिकांच्या पाल्यांसाठी वसतिगृह प्रवेश सुरू
Total Views: 17