विशेष बातम्या

"हॉटेल बिलाचा वाद – शिवीगाळ, धमकी आणि खंडणीची मागणी; आरोपी गजाआड" th 

Hotel bill dispute abuse


By nisha patil - 3/22/2025 8:21:03 PM
Share This News:



"हॉटेल बिलाचा वाद – शिवीगाळ, धमकी आणि खंडणीची मागणी; आरोपी गजाआड" th 

 हॉटेल बिल न दिल्याने शिवीगाळ व खंडणीची मागणी – शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपी न्यायालयात हजर

 मध्यवर्ती बसस्थानकासमोरील गिरीश हॉटेलमध्ये बिल मागण्याच्या कारणावरून एका कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अभय मोरे उर्फ आडग्या व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना आज  ताब्यात घेण्यात आले 

फिर्यादी प्रकाश शेखर शेट्टी हे हॉटेलमध्ये काम करत असताना, दिनांक २१ मार्च २०२५ रोजी दुपारी १ वाजता आरोपी अभय मोरे आणि त्याचे साथीदार शाम काकासो जाधव व नागेश बाळू वाघमारे हे हॉटेलमध्ये आले. त्यांनी हॉटेलचे बिल भरण्यास नकार दिला. फिर्यादी यांनी बिल मागितले असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत धमकी दिली की, "परत बिल मागशील तर ठार मारीन." तसेच, हॉटेल चालू ठेवायचे असेल तर दरमहा १० हजार रुपये खंडणी द्यावी लागेल, असे सांगून ते निघून गेले.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सागर गुणवरे, पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांना आज कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आले.

पुढील तपास शाहूपुरी पोलिस करत आहेत.


"हॉटेल बिलाचा वाद – शिवीगाळ, धमकी आणि खंडणीची मागणी; आरोपी गजाआड" th 
Total Views: 36