विशेष बातम्या
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजुरी व पहिला हप्ता वितरण
By nisha patil - 2/22/2025 10:17:49 PM
Share This News:
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजुरी व पहिला हप्ता वितरण
शनिवार, 22 फेब्रुवारी 2025 रोजी प्रधानमंत्री आवास योजना (टप्पा 2) अंतर्गत घरकुल मंजुरी आदेश व पहिला हप्ता वितरणाचा राज्यस्तरीय मेळावा पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुल येथे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडला.
त्याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यक्रम करवीर पंचायत समिती व विवेकानंद महाविद्यालय, नागळा पार्क येथे झाला. या कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यातील 38,000 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्र देण्यात आले, तर 24,600 लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्यापोटी 1,500 रुपये जमा करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या कार्याची प्रशंसा करत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी 31 मे रोजी घरकुल अर्पण सोहळा आयोजित करण्याची घोषणा केली.
या सोहळ्यात प्रधानमंत्री सूर्य घर योजना, बँक कर्ज सुविधा व आधार लिंकिंगसाठी विविध स्टॉल्स उभारण्यात आले होते.
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजुरी व पहिला हप्ता वितरण
|