बातम्या

आपला मेंदू किती GB चा आहे.....?

How many GB is your brain


By nisha patil - 9/10/2024 6:12:25 AM
Share This News:



क्षमता...
*मेंदूची क्षमता असते अंदाजे २.५ पेटाबाईट.
१ पेटाबाईट म्हणजे १००० टेराबाईट.
१ टेरा बाईट १००० जीबी. 
म्हणजे १६ जीबी ची मेमरी असलेले १ लाख ५६ हजार फोन...!

गती...
मानवाचा मेंदू संगणकापेक्षाही जास्त गतीने काम करतो.
आपला मेंदू एका सेकंदात ३८ हजार ऑपरेशन करू शकतो. यातून हे स्पष्ट होते की आपल्या मेंदूची क्षमता ही संगणकापेक्षाही जास्त आहे.

मोजमाप...
*मेंदूमधील सगळ्या रक्तवाहिन्या एकापुढे एक पसरविल्या, तर एक लाख मैल इतक्या लांबीच्या किंवा पृथ्वीला चार प्रदक्षिणा घालण्याइतक्या लांबीच्या होतील.

*एका मेंदूतले सगळे न्यूरॉन्स एकापुढे एक मांडले तर त्याची लांबी साधारणपणे १००० कि.मी. एवढी होईल. पण, न्यूरॉन्सची रुंदी फक्त १० मायक्रॉन असल्यामुळे ते आपल्याला दिसणारच नाहीत.

आपल्या मेंदूमध्ये १०००० कोटी मज्जापेशी (न्यूरॉन्स) असतात...
आकाशगंगेत असणार्‍या तार्‍यांएवढी ही संख्या असते. दर सेकंदाला एक न्यूरॉन याप्रमाणे आपण मोजमाप करायला लागलो, तर आपल्याला फक्त एका मेंदूतले न्यूरॉन्स मोजायला ३१७१ वर्षे लागतील! 

 


आपला मेंदू किती GB चा आहे.....?