बातम्या

मनसे किती जागा लढवणार…राज ठाकरे यांची मोठी घोषणा

How many seats will MNS contest


By nisha patil - 7/25/2024 2:31:17 PM
Share This News:



महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पक्षाच्या बैठकीत त्यांनी महायुतीलाही घेरले. लोकसभेत महायुतीसोबत असलेल्या राज ठाकरे यांनी महायुतीची महत्वकांक्षी योजना लाडकी बहीणवर टीका केली. सरकारकडे देण्यासाठी पैसे आहेत का? असा थेट विचारला. त्याचवेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्या लोकांना सत्तेत बसवायचे आहे. ही गोष्टी घडणार म्हणजे घडणार आहे. आम्ही सर्वच जण त्यासाठी तयारीला लागलो. युती होणार की नाही? हा विचार तुम्ही करु नका. परंतु आपण २०० ते २२५ जागा लढवणार आहोत, असे घोषणा राज ठाकरे यांनी केली. १ ऑगस्टनंतर आपण राज्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात विधानसभा निवडणुकीसाठी काय करावे, हे कार्यकर्त्यांना सांगितले. ते म्हणाले की, राज्यातील प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष दिले पाहिजे. हेच विधानसभा निवडणुकीचे तुमचे कँपेन असले पाहिजे. एकमेकांना शिव्या द्यायच्या आणि शिव्या देत लोकांचे लक्ष विचलीत करायचे आणि निवडणूका करायच्या हे काही कामात नाही.


मनसे किती जागा लढवणार…राज ठाकरे यांची मोठी घोषणा