बातम्या
मला देखील तो धक्काच : संभाजी राजे छत्रपती
By nisha patil - 5/11/2024 9:41:19 PM
Share This News:
मला देखील तो धक्काच : संभाजी राजे छत्रपती
असं घडायला नको होतं... काय म्हणाले संभाजी राजे
संभाजीराजे छत्रपती यांनी एक निवेदन देताना सांगितले, "काही गोष्टी खाजगी असाव्यात, कारण शेवटी आम्ही एक कुटुंब आहोत, आणि मी त्याच कुटुंबाचा सदस्य आहे. जे काही घडलं, त्याबद्दल आम्हाला सुद्धा दुःख आहे. असं घडायला नको होतं. पण शाहू महाराजांनी जी लाईन दिली आहे, ती आम्हाला लागू आहे."
ते पुढे म्हणाले, "शाहू महाराजांनी या संदर्भात स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. मी याबद्दल जास्त माहिती नाही कारण हे सर्व घडताना, मी नागपूरला होतो. तेव्हा परिवर्तन महाशक्तीची पत्रकार परिषद सुरू होती. मला देखील याबाबत धक्का बसला होता. असं अचानक काही घडू शकतं हे अपेक्षित नव्हतं. असं काहीही पूर्वनियोजितपणे होऊ शकत नाही. आमचं छत्रपती घराणं असं वागणार नाही."
मला देखील तो धक्काच : संभाजी राजे छत्रपती
|