बातम्या

मी जातीयवादी नाही, आरक्षण मागतोय... मनोज जरांगे

I am not a casteist I am asking for reservation


By nisha patil - 8/29/2024 2:45:47 PM
Share This News:



   राज्यात एकीकडे विधानसभा निवडणूकांचे सर्व राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे 288 पाडणार की नाही याबाबत भूमिका नेमकी कधी मांडणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, आज काम सोडून कोणीही येऊ नका असं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे म्हणालेत. आज छोटी बैठक असून विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यावर  भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. 
         

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे मागील अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसह विधानसभेत २८८ पाडायचे की नाही यावर बोलताना दिसत आहेत. राज्यात मराठा आरक्षण कार्यकर्ते याबाबत महाविकास आघाडीसह मराठवाड्यात येणाऱ्या नेत्यांना भूमिका मांडत आहेत. 
         

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे मराठा आरक्षणाबाबत आणि विधानसभा निवडणूकांच्या बाबतीत जरांगे कधी भूमीका मांडणार? विधानसभेत किती उमेदवार उतरवायचे यासंदर्भात ते जी बैठक घेणार होते ती बैठक पुढे ढकलल्याने जरांगे त्यांची भूमिका कधी मांडणार? असा प्रश्न उपस्थित होत असून निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यावर यावर भूमिका मांडणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं.


मी जातीयवादी नाही, आरक्षण मागतोय... मनोज जरांगे