बातम्या

मी सर्व सहमतीने केलं ; गाडेचा धक्कादाय खुलासा

I did everything agreeably


By nisha patil - 2/28/2025 12:59:57 PM
Share This News:



मी सर्व सहमतीने केलं ; गाडेचा धक्कादाय खुलासा

पुणे पोलिसांनी शिताफीनं कारवाई करत गुनाट गावातील शेतात लपून बसलेल्या दत्ता गाडेला अटक केली आहे. पोलिसांनी कोठडीत नेल्यानंतर गाडेनं भावुक होत आपली चूक कबूल केली. "माझं चुकलं, मी पापी आहे, मला माफ करा," असं टाहो फोडून त्यानं कबुली दिली.

मात्र, याच वेळी त्यानं एक मोठा दावा करत अत्याचाराचा आरोप फेटाळला. "मी कोणावरही अत्याचार केले नाहीत, संबंध सहमतीने आले आहेत," असा धक्कादायक दावा त्याने पोलिसांसमोर केला आहे. या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून, सत्य बाहेर येण्यासाठी पोलीस अधिक तपशीलवार चौकशी करत आहेत.


मी सर्व सहमतीने केलं ; गाडेचा धक्कादाय खुलासा
Total Views: 42