बातम्या
मी पुढे एक शब्दही बोलणार नाही : मनोज जरांगे
By nisha patil - 9/9/2024 7:53:45 PM
Share This News:
फडणवीसांनी आपल्याविरोधात मराठा आमदार उभे केलेत, त्यांनी जर आरक्षण दिलं नाही तर त्यांना राजकारणात लोळवल्याशिवाय मराठा समाज मागे हटणार नाही असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. बीडमध्ये झालेल्या घोंगडी बैठकीमध्ये मनोज जरांगे यांनी हे वक्तव्य केलं.
देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले की, तुम्हाला गरिबांची मुलं मोठी व्हावेत असं का वाटत नाही? या सरकारमधील मंत्र्यांना गरिबांची पोरं मोठी होऊ नयेत असं का वाटतं? तुम्हाला फक्त तुमचा पक्ष आणि नेते मोठे करायचे आहेत. देवेंद्र फडणवीस, मराठ्याच्या मुलांनी तुमचं काय वाकडं केलं? मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्या विरोधात उभे केले. कुठे केसेस करत आहे, कुठे मराठ्यांचे आमदार विरोधात उभे करता. फडणवीस तुम्हाला लोळवल्याशिवाय आता मराठा समाज मागे हटत नाही. जर तुम्ही आरक्षण दिले नाही तर आम्हाला सत्ता काबीज करावी लागणार. मराठा समाज्याच्या आरक्षणासाठी वाटेल ते करेन.
तुम्ही आरक्षण दिलं नाही तर मग मी राजकीय बोलणार असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.
मी पुढे एक शब्दही बोलणार नाही : मनोज जरांगे
|