बातम्या

कोल्हापुरात आयटी पार्क होणारच... उद्योगमंत्री उदय सामंत

IT Park will be built in Kolhapur


By nisha patil - 1/25/2025 8:26:58 PM
Share This News:



राज्य शासनाकडून आयटी पार्क उभारण्याबाबत बैठका सुरू....

कोल्हापुरात आयटी पार्क होणारच... उद्योगमंत्री उदय सामंत

बऱ्याच वर्षांपासून कोल्हापुरात आयटी पार्क उभा करण्याची मागणी होतेय. राज्य शासनाकडून आयटी पार्क उभारण्याबाबत बैठका सुरू आहेत. त्यामुळे कोल्हापुरात आयटी पार्क होणारच, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. 
 
बऱ्याच वर्षांपासून कोल्हापुरात आयटी पार्क उभा करण्याची मागणी होतेय. राज्य शासनाकडून आयटी पार्क उभारण्याबाबत बैठका सुरू आहेत. त्यामुळे कोल्हापुरात आयटी पार्क होणारच, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. दावोसमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणुकीचा लाभ हा कोल्हापूरलाही होणार असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केलंय. दावोसमध्ये नुकतीच जागतिक आर्थिक परिषद पार पडली. लवकरच ही बैठक होऊन आयटी पार्क उभारण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल. दावोस येथील करारांमुळे राज्यात मोठ्या उद्योगांच्या गुंतवणुकीला आम्ही प्राधान्य दिले आहे. कोणताही नि प्रकल्प राज्यात आला की त्याचा फायदा राज्यातील अन्य जिल्ह्यांतील उद्योगांनाही होतो. कोल्हापुरातील फौंड्री तसेच अन्य लघु उद्योगांनाही लाभ होणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.


कोल्हापुरात आयटी पार्क होणारच... उद्योगमंत्री उदय सामंत
Total Views: 55