बातम्या

इचलकरंजी ते कोल्हापूर एस.टी. रुकडी मार्गे सुरु करा

Ichalkaranji to Kolhapur ST Start via Rukdi


By nisha patil - 2/8/2024 3:01:10 PM
Share This News:



इचलकरंजी ते कोल्हापूर एस.टी. रुकडी मार्गे सुरु करा अशी मागणी  खा. धैर्यशिल दादा माने यांच्या माध्यमातून सरपंच राजश्री संतोष रुकडीकर व उपसरपंच शीतल खोत , माजी उपसरपंच शमुवेल लोखंडे संतोष रुकडीकर , दिलीप इंगळे यांनी केली होती. या  मागणीला अखेर यश आले आहे. 
               

रुकडी ता.हातकणंगले या गावची लोकसंख्या जवळपास 30 हजाराच्या घरात आहे. गावातील अनेक विध्यार्थी शिक्षणा साठी तर गावकरी ही नोकरी निम्मित इंचलकरंजी येथे जात असतात मात्र इंचालकरंजी येथे जाण्यासाठी खासगी वडाप शिवाय पर्याय नाही. खासगी वडाप हे पूर्ण क्षमतेने भरल्या शिवाय मार्गस्थ होत नसल्याने याचा फटका परीक्षार्थी विध्यार्थी व नोकरदार यांना होत असतो. रुकडी येथे  , माणगाव , तिळवणी , साजनी या गावातून विध्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या सर्व विध्यार्थ्यांना एस टी बस ची सोय नसल्याने त्यांना अहिल्याबाई होळकर मोफत एसटी पास सवलत व नागरिक व महिला यांना 50% दारात प्रवास या सवलतीचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे इंचलाकरंजी हून कोल्हापूर कडे जाणारी एसटी व कोल्हापूर हून इंचलकरंजी कडे जाणारी एसटी ही रुकडी मार्गे सुरु करावी. अशा मागणीचे निवेदन *दि. १ डिसेंबर २०२३ रोजी देण्यात आले होते या मागणीला यश आले असून इंचलकरंजी ते रुकडी दररोज 3 फेऱ्या होणार आहेत सदर एस टी सेवा उद्या.दि. 2 ऑगस्ट सकाळी 7: 35 रुकडी ते इंचालकरंजी या मार्गे सुरु होणार आहे. 
             

या साठी विभाग नियंत्रक शैलजा बोरटक्के , वाहतूक अधीक्षक अतुल मोरे , सहाय्यक अधीक्षक महेश पाटील , यांचे  सहकार्य लाभले. या वेळी जावेद मकानदार , यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे ही सहकार्य  लाभले . या बद्दल गांवांतून सरपंच , उपसरपंच , ग्रा.प. सदस्य यांचे कौतूक होत आहे.


इचलकरंजी ते कोल्हापूर एस.टी. रुकडी मार्गे सुरु करा