ताज्या बातम्या
शिवभोजन थाळीबंद केल्यास गंभीर परिमाण भोगावे लागतील
By nisha patil - 2/18/2025 8:25:06 PM
Share This News:
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चालू केलेली व गोरगरिबांचं अल्प मोबदल्यात पोट भरणारी शिवभोजन थाळी योजना या सरकारने बंद करू नये.अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलीय.मागण्याचे निवेदन शहर प्रमुख रविकीरण इंगवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अन्नपुरवठा अधिकाऱ्यांना दिलंय.
ही योजना बंद केल्यास गोरगरीब जनतेचं हाल होणार आहे. योजना बंद करू नये अन्यथा याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय. पुरवठा अधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आलंय.
यावेळी सुनील मोदी, प्रतिज्ञा उतुरे, रीमा देशपांडे, जहिदा खान, विशाल देवकुळे, रवी चौगुले, योगेंद्र माने, अनिल पाटील, धनाजी दळवी, दिलीप शिंदे आदी उपस्थित होते
शिवभोजन थाळीबंद केल्यास गंभीर परिमाण भोगावे लागतील
|