बातम्या

प्रेमाने मागितलं असतं तर दिलं असतं"; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर निशाणा

If love had asked it would have given


By nisha patil - 4/11/2024 2:54:01 PM
Share This News:



राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कोल्हापुरात झालेल्या सभेत अजित पवारांवर कडवट टीका केली. "वडिलांच्या अधिकाराने मागितलं असतं तर सगळं देऊन टाकलं असतं, पण हेच बहिणीचं प्रेम अजित पवारांना समजलं नाही," असे त्यांनी सांगितले.

"त्यांनी प्रेमाने मागायला हवं होतं, हिसकावून घेण्याची गरज नव्हती. जर हिसकावून घेतलं तर काहीच देणार नाही," असे सुळे म्हणाल्या. बहीण-भावाच्या नात्याबद्दल बोलताना त्यांनी नमूद केले की, "बंटी दादा जे काही मागतात, ते मी बहीण म्हणून देते. हेच खरं नातं आहे बहीण-भावाचं, जे महाराष्ट्राच्या नेत्यांना समजलं नाही," असे मतही त्यांनी व्यक्त केले.


प्रेमाने मागितलं असतं तर दिलं असतं"; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर निशाणा