बातम्या
आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा
By nisha patil - 1/1/2025 11:01:44 PM
Share This News:
आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा
शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी मंत्री जयकुमार गोरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शिरोळ तालुक्यातील विकासकामे, ग्रामीण पायाभूत सुविधा, आणि पंचायत राज यंत्रणेच्या सुधारणा यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर त्यांनी सकारात्मक चर्चा केली.
या भेटीमुळे शिरोळ तालुक्यातील विकास प्रक्रियेसाठी नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा
|