बातम्या
आकुर्डे-महालवाडीत तरुणींना वश करण्यासाठी प्रेमवीरांनी केले अघोरी कृत्य
By nisha patil - 3/3/2025 2:58:48 PM
Share This News:
आकुर्डे-महालवाडीत तरुणींना वश करण्यासाठी प्रेमवीरांनी केले अघोरी कृत्य
मुलींचे फोटो, लिंबू आणि काळ्या बाहुल्यांचाही वापर....
आकुर्डे-महालवाडीत कुराण नावाच्या शेतातील गवताच्या माळावर अघोरी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आलाय. तरुणींना वश करण्यासाठी प्रेमवीरांनी अघोरी कृत्य केले असून बाभळीच्या झाडाला दाभणाने मुलींचे फोटो लटकवलेत. तसेच लिंबू आणि काळ्या बाहुल्यांचाही वापर केला आहे. ही घटना अमावस्येच्या मध्यरात्री घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काळ्या बाहुल्यांबरोबरच युवतींचे फोटोही झाडाला बांधले असून दाभणामध्ये युवतींच्या ड्रेसची बटणेही काळ्या दोऱ्यामध्ये अडकवली आहेत. महालवाडीतील ग्रामदैवताच्या यात्रेच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी ग्रामस्थ कुराण माळावर ग्राऊंड करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हा अघोरी प्रकार उघडकीस आलाय. यामुळे परिसरात खळबळ उडालीय. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय.
आकुर्डे-महालवाडीत तरुणींना वश करण्यासाठी प्रेमवीरांनी केले अघोरी कृत्य
|