बातम्या

शाहुवाडी पन्हाळ्यात सावकार विरुद्ध आबा चं !

In Shahuwadi Panhala against moneylender Aba


By nisha patil - 5/10/2024 8:54:37 PM
Share This News:



आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल काही दिवसा नंतर वाजेल शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदार संघात पक्षनिष्ठ नव्हे व्यक्तीनिष्ठ राजकारण असेच समीकरण विधानसभेसाठी आजपर्यंत येथे होत आलेले आहे आणि आगामी काळात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असे समीकरण जरी असले तरी विधानसभेसाठी व्यक्तिनिष्ठ राजकारणच चालणार अशी स्थिती शाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदार संघात आहे. याच मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी .....

राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा जरी सामना रंगणार असला तरी शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघांमध्ये भाजपचे मित्रपक्ष असणाऱ्या जनसुराज्य पक्षाचे आमदार डॉ विनय कोरे (सावकर) विरुद्ध शिवसेना ठाकरे  गटाचे  महाविकास आघाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर (आबा )असाच सामना रंगणार असे चित्र येथे पाहायला मिळनार आहे. शाहुवाडी पन्हाळा मतदार संघात जनसुराज्य पक्ष हा भाजपचा मित्र पक्ष असल्याने भाजपचे मतदान जरी नगण्य असले तरी ते मतदान निर्णायक आहे. याठिकाणी  महायुती मजबूत असली तरी महायुतीचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना कडवी झुंज देणारे महाविकास आघाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी लोकसभेला दिलेली कडवी झुंज येथील जनता विसरलेली नाही.

राष्ट्रवादी पक्षामध्ये  अजित पवार गट व शरद पवार गट असे समीकरण जरी दिसून आले तरी यातील कोणता गट महाविकास आघाडी बरोबर राहणार हाही विषय चर्चेचा आहे.

ठाकरे गट राज्यस्तरावर काँग्रेस बरोबर आहे.परंतु येथील काँग्रेसचे नेते व गोकुळचे विद्यमान संचालक करण सिंह गायकवाड हे जनसुराज्य पक्षाबरोबर स्थानिक राजकारणामुळे आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे तालुक्यातील  नेते मानसिंगराव गायकवाड (दादा )हे स्थानिक राजकारणासाठी सत्यजित पाटील यांच्याबरोबर आहेत. त्यांची व उदय सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक रणवीर सिंह गायकवाड यांची मात्र ताकत पुढील काळासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे .

राज ठाकरे यांची मनसे,शिंदेची शिवसेना व चळवळीतील अग्रणीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई भारत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना, यांच्यासह आरपीआय, भारतीय दलित महासंघ, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया,या संघटना व पक्षांसह तालुक्यातील सामाजिक संघटनांची  ताकद विसरून चालणार नाही .

 त्याचबरोबर शाहुवाडी  पन्हाळा विधानसभेचे दीर्घकाळ नेतृत्व केलेले माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील घराण्याचे अमर पाटील व डॉ जयंत पाटील, तसेच विनय कोरे यांचे कट्टर विरोधक असलेले बाबासाहेब पाटील असुरलेकर यांची ही ताकद निर्णयाक आहे.

या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे स्वरूप सध्या तरी येथे देता येणार नाही. कारण शाहूवाडी तालुक्यांमध्ये नेहमीच गटा तटाचे  राजकारण आणि पारंपारिक लढती होत राहिलेल्या आहेत. त्यामुळे कोरे विरुद्ध पाटील असाच सामना येथे रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

जनसुराज्य पक्षामध्ये इनकमिंग जरी सध्या सुरू असले तरी नेते जातील परंतु जागृत जनतेच्या मनात काय आहे हा काळच ठरवेल?


शाहुवाडी पन्हाळ्यात सावकार विरुद्ध आबा चं !