बातम्या

तांबे अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करून पालकांना न सांगण्याची धमकी...

In Tambe Academy students were beaten up and threatened not to tell their parents


By nisha patil - 6/25/2024 7:54:52 PM
Share This News:



इचलकरंजी शहरातील तांबे क्लास येथील शिक्षकांनी  विद्यार्थ्यांना प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये जाऊन मारहाण मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा मोबाईल काढून घेऊन ही बाब पालकांना न सांगण्याची धमकी दिल्याची बाब देखील समोर आली आहे. विद्यार्थ्यांकडून पालकांना जेव्हा घडलेली घटना समजलीA तेव्हा पालकांनी तांबे अकॅडमी मध्ये जाऊन शिक्षकांना यासंदर्भात जाब विचारतच तेथील शिक्षकांनी पालक व पत्रकारांच्या अंगावर जाऊन शिवीगाळ केली यावेळी काही काय तनावाचे वातावरण निर्माण झाले. गेली 20 वर्ष ही संस्था कार्यरत असून अनेक तक्रारी संस्थेच्या विरोधात आलेले आहेत याशिवाय शिक्षक हे हुकूमशाही पद्धतीने शिक्षण शिकवतात अशा तक्रारीही अकॅडमी बद्दल चर्चेला जात असून पालकांकडून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यावेळी स्थानिक रहिवाशांच्या देखील या संस्थेबद्दल बऱ्याच तक्रारी समोर आल्या आहेत.


तांबे अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करून पालकांना न सांगण्याची धमकी...