विशेष बातम्या
‘डिजिटल मिडीया उद्योगः नवे प्रवाह’ या विषयावर पत्रकारिता विभागात
By nisha patil - 3/18/2025 5:38:18 PM
Share This News:
‘डिजिटल मिडीया उद्योगः नवे प्रवाह’ या विषयावर पत्रकारिता विभागात
दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन विभागाच्यावतीने, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM USHA) अंतर्गत, ‘डिजिटल मिडीया उद्योगः नवे प्रवाह’ या विषयावर दि. 20-21 मार्च 2025, दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी 10.00 ते 5.00 या कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन ‘डिजिटल मिडीया उद्योग आणि डिजिटल संघटनचे अध्यक्ष आणि जेष्ठ संपादक, राजा माने यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ संपादक डॉ.दशरथ पारेकर असणार आहेत. या कार्यशाळेचे आयोजन पत्रकारिता व मास कम्युनिकेशन या विषयाचे विद्यार्थी यांच्यासाठी करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेसाठी मोफत नोंदणी असून, सहभागी होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे अशी माहिती विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.निशा पवार यांनी दिली आहे. या कार्यशाळेचे समन्वयक, डॉ.चंद्रशेखर वानखेडे व डॉ.शिवाजी जाधव आहेत.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी डॉ.राजेंद्र पारिजात, ‘डिजिटल जाहिराती व डिजिटल मार्केटींग’ या विषयावर, धनंजय बिजले (सकाळ, पुणे), ‘डिजिटल माध्यमांचा प्रिंट मिडियातील वापर’ या विषयावर, योगेश बोराटे (पुणे विद्यापीठ) ‘डिजिटल माध्यमातील नव्या संधी’, सायबर ज्युरिक्सचे अध्यक्ष, आर, विनायक, यांचे ‘डिजिटल माध्यमातील रोजगार संधी’ या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
कार्यशाळेच्या दुस-या दिवशी बी न्यूज चे मुख्य संपादक, चारुदत्त जोशी, ‘टेलिव्हिजनमधील डिजिटल मिडियाचा वापर’ या विषयावर तर सकाळ, कोल्हापूर आवृत्तीचे, निवासी संपादक, निखिल पंडीतराव, ’वृत्तपत्रांवर डिजिटल माध्यमांचा परिणाम’ या विषयावर, मराठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक, सुमित पाटील यांचे ‘चित्रपट उद्योगांमध्ये डिजिटल मिडीयाचा वापर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
‘डिजिटल मिडीया उद्योगः नवे प्रवाह’ या विषयावर पत्रकारिता विभागात
|