ताज्या बातम्या
इचलकरंजी शहरात भव्य कै. भाई नेरूरकर खो-खो स्पर्धांचे आयोजन
By nisha patil - 2/24/2025 3:12:20 PM
Share This News:
इचलकरंजी शहरात भव्य कै. भाई नेरूरकर खो-खो स्पर्धांचे आयोजन
जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठक संपन्न...
इचलकरंजीत आयोजित केल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित कै. भाई नेरूरकर खो-खो स्पर्धांच्या आयोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.या बैठकीत स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध नियोजनात्मक बाबींचा आढावा घेण्यात आला.
स्पर्धेच्या नियोजन, खेळाडूंच्या सहभाग, मैदान व्यवस्थापन तसेच प्रेक्षकांसाठी आवश्यक सुविधा यावर सखोल चर्चा झाली. ही स्पर्धा खो-खो क्रीडाप्रेमींसाठी एक ऐतिहासिक पर्वणी ठरणार आहे. या बैठकीस मा. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आ.राहुल आवाडे व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या शेखर शहा सर, तात्या कुंभोजे, सुनील पाटील, राजन उरुनकर, जी. जी. कुलकर्णी, क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी नीलिमा अडसूळ, नाना पाटील, अरुण पाटील यांच्यासह सर्व विभागीय क्रीडा अधिकारी उपस्थित होते.
इचलकरंजी शहरात भव्य कै. भाई नेरूरकर खो-खो स्पर्धांचे आयोजन
|