ताज्या बातम्या
खडकेवाडच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा व विकास कामांचा शुभारंभ ना.मुश्रीफांच्या हस्ते..
By nisha patil - 11/2/2025 3:19:03 PM
Share This News:
खडकेवाडच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा व विकास कामांचा शुभारंभ ना.मुश्रीफांच्या हस्ते..
खडकेवाडेतील ग्रामपंचायत खडकेवाडच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा व विविध विकास कामांचा शुभारंभ ना.हसन मुश्रीफांच्या हस्ते पार पडला. त्याचबरोबर विधानसभा मतदारसंघाच्या आ. पदी सलग सहाव्यांदा निवड झाल्याबद्दल व महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल ना.हसन मुश्रीफांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी ना. मुश्रीफ म्हणाले, खडकेवाडा - बेळंकी ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत 603 मताचे मताधिक्य दिल्याबद्दल आभार मानले. येत्या दोन वर्षात राहिलेली विकास कामे पूर्ण करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी बिद्री कारखान्याचे संचालक आर व्ही पाटील, पैलवान रवींद्र पाटील, फत्तेसिंह भोसले - पाटील, माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकासराव पाटील, रामचंद्र सातवेकर, यांच्यासह ग्रामस्थ, बंधू - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खडकेवाडच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा व विकास कामांचा शुभारंभ ना.मुश्रीफांच्या हस्ते..
|