बातम्या
टोप हायस्कूलच्या शालेय क्रीडा स्पर्धेला आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या उपस्थितीत शुभारंभ..
By Administrator - 11/12/2024 4:19:41 PM
Share This News:
टोप हायस्कूलच्या शालेय क्रीडा स्पर्धेला आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या उपस्थितीत शुभारंभ..
क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक सुरुवात
टोप हायस्कूलच्या वतीने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि दलीतमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते आणि जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. निलिमा आडसुळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. यावेळी माजी सभापती डॉ. प्रदीप पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष दौलत पाटील, पोलीस उपनिरीक्षक आणि प्रो-कबड्डी खेळाडू महेश मगदूम, नृत्य-नाट्य दिग्दर्शक उमेश चौगुले, लक्ष्मण भोसले (तात्या), शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गणेश पाटील, संचालक सुरेश पाटील व पोपट पाटील, मुख्याध्यापक के. बी. पाटील, पर्यवेक्षिका सौ. एस. आर. पाटील, संतोष पाटील, आनंदा भोसले यांसह शिक्षक-शिक्षिका, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टोप हायस्कूलच्या शालेय क्रीडा स्पर्धेला आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या उपस्थितीत शुभारंभ..
|