शैक्षणिक
अर्थवेध भिंती पत्रकाचे शहाजी मध्ये उद्घाटन
By nisha patil - 2/14/2025 3:51:09 PM
Share This News:
अर्थवेध भिंती पत्रकाचे शहाजी मध्ये उद्घाटन
कोल्हापूर: श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने अर्थसंकल्प 2025- 26 यावर आधारित अर्थवेध या भितीपत्रकाचे उद्घाटन झाले. सदर भित्तिपत्रकाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शाणेदिवान सर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आय. क्यू.ए.सी समन्वयक डॉ राहुल मांडणीकर, सहसमन्वयक डॉ ए. बी. बलुगुडे यांची होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.श्रीमती एस. एस. राठोड मॅडम यांनी केले. आभार डॉ.डी.पी.गावडे सर यांनी मानले. तर सूत्रसंचालन डॉ, सौ.एस.व्ही. मोरे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक. विद्यार्थी उपस्थित होते.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले.
अर्थवेध भिंती पत्रकाचे शहाजी मध्ये उद्घाटन
|