बातम्या

भैरवनाथ सांस्कृतिक हाॅलचे उद्घाटन

Inauguration of Bhairavanath Cultural Hall


By nisha patil - 10/16/2024 10:24:58 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) बहिरेवाडी (ता.पन्हाळा) येथील एच.आर.जाधव सहकार समुहातील भैरवनाथ सांस्कृतिक हाॅलचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले..

सहकारामुळे गावपातळीवर विकास सेवा संस्था,पतसंस्था,पाणी पुरवठा संस्थांच्या माध्यमातून आर्थिक विकास साधता येतो. अशा संस्था नावारूपाला येतील हेच एच.आर.जाधव सहकार समुहाने सिद्ध करून दाखवले आहे असे प्रतिपादन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केले...

*यावेळी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच.आर.जाधव (आण्णा),कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे माजी उपाध्यक्ष प्रा.जयंत पाटील (सर),गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील,गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड,वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),शंकर पाटील,बाळासाहेब सरनाईक,जनसुराज्य शक्तीचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील,बहिरेवाडी गावचे माजी सरपंच शिरीषकुमार जाधव,अमरसिंह माने,बाबासाहेब शिंदे,अमरसिंह जाधव यांच्यासह वारणा समुह व एच. आर.जाधव समुहातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


भैरवनाथ सांस्कृतिक हाॅलचे उद्घाटन